शासकीय नोकरांची सोसायटी असावी अश्या संकल्पनेतून सन ४ ऑक्टोबर १९१२ साली कै. हरी श्रीकृष्ण देव या सत्पुरुषाने या संस्थेची पायाभरणी केली. या संकल्पनेस तत्कालीन सांगलीचे राजेसाहेब हिज हायनेस राजा चिंतामणरावजी पटवर्धन यांच्या कृपा प्रसाद व आशीर्वादाने या संस्थेचा कळस उभा राहिला. सुरवातीच्या काळात या संस्थेचे केवळ १६० सभासद होते. कालांतराने सभासदांची वाढ ९१५५ पर्यंत गेली. ४५ विविध शासकीय विभागांचे कर्मचारी यात सभासद म्हणून आहेत. वेळोवेळीच्या संचालक मंडळाच्या अथक परिश्रम व सभासद हा संस्थेचा मूळ गाभा लक्षात घेऊन घेण्यात आलेल्या सभासद हितोपयोगी निर्णयांमुळे संस्थेची प्रगती दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे.
सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून संस्थेचा बोलबाला आहे. शतकपूर्ती पूर्ण झाल्याने संस्थेचा मानांकन वाढविण्यात आज पर्यंत झालेल्या व असणाऱ्या संचालक मंडळाचे योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे. सभासदांच्या वाढत्या आर्थिक गरज लक्षात घेता सभासदांची आर्थिक पत वाढविण्यासाठी संचालक मंडळाने सभासदांनी रु. २५ लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढविली आहे. यामुळे आज सभासदांना स्वतःचे घर, प्लॉट, मुलामुलींच्या उच्च शिक्षणाची सोय, विवाह इ. खर्चिक बाबी सहजपणे पार पडणे शक्य होते.
संस्थेवर असणाऱ्या विश्वासामुळे संस्थेकडे ठेवीचे प्रमाणातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. सभासदांच्या इतर आर्थिक गरजा लक्षात घेऊन सभासद कर्ज, ठेवतारण कर्ज, आकस्मिक कर्ज, हायरपर्चेस कर्ज, शैक्षणिक कर्ज इ. अनेक कर्ज योजना कार्यान्वित आहेत.
संस्थेने स्वतःचा सॅलरी कर्ज सुरक्षा निधी फंड पोटनियमानुसार तयार करून ज्या सभासदांचा संस्थेने सॅलरी कर्ज सुरक्षा निधी फंड घेतला आहे, तो सभासद मयत झालेस, त्या संबंधित सभासदाचे कर्ज निरंक केले जाते. यामुळे सभासदांच्या वारसांना व जामीनदारांना जामीनकीमधून निरंक झालेने फायदा होत आहे. यामुळे सभासदांचे राहणीमान निश्चितच सुधारले आहे. या व्यतिरिक्त जीवनरक्षक ठेव, आजीव सभासद ठेव योजना, कल्याण निधी, अपघात विमा इत्यादी सभासदांच्या हिताच्या योजनाही राबविल्या जातात.
सभासद संख्या | भांडवल | राखीव निधी | कर्ज | गुंतवणूक | ठेवी |
---|---|---|---|---|---|
८८४७ | ७७.३६ कोटी | २५.४९ कोटी | ३०५.५७ कोटी | ५८.२८ कोटी | २३७.३३ कोटी |
संस्थेच्या सभासदांकरिता कल्याणकारी योजना :-
१) सॅलरी कर्ज सुरक्षा निधी - विद्यमान संचालक मंडळाने नव्यानेच “सॅलरी कर्ज सुरक्षा निधी” ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत संबंधीत कर्जदाराच्या विविध प्रकारच्या कर्जाच्या एकत्रित रकमेवर अत्यंत अल्पदरात हप्ता आकारला जातो. संबंधीत कर्जदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास जेवढया कर्जबाकीसाठी हप्ता स्विकारला आहे तेवढया पुर्ण रकमेचा लाभ देण्यात येऊन कर्ज खाते निरंक केले जाते त्यामुळे संस्थेची कर्जवसुली होवून त्यंचा वारसांस व जामीनदारांस खुपच आर्थिक दिलासा मिळालेला आहे.
२) कल्याण निधी - सभासदांना गंभीर आजारात पुर्वी रु.७०००/- इतकी आर्थिक मदत दिली जात होती त्यामध्ये विद्यमान संचालक मंडळाने वाढ करुन सध्या रक्कम रु.१५०००/- इतकी आर्थिक मदत दिली जाते.
३) मयत फंड - सभासद नोकरीत असताना मृत्यु झाल्यास त्यांचे वारसांना पुर्वी रक्कम रु.२०००/- इतकी मदत दिली जात होती. त्यामध्ये विद्यमान संचालक मंडळाने वाढ करुन सध्या रु.५०००/- इतकी रक्कम सभासदांचे वारसांना मदत म्हणून दिली जाते
४) जीवनरक्षक निधी फंड- या निधीतून सभासदांचा सेवेत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्यास सभासदांचे वारसास रु. २५०००/- इतकी आर्थिक मदत दिली जाते
कर्ज व्याजदरात कपात - गेल्या ५ वर्षाच्या कार्यकालामध्ये विद्यमान संचालक मंडळाने २ वेळा कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात करुन अत्यंत चांगला व धाडसी निर्णय घेतला असल्याने सभासदांचा त्यामुळे फार मोठा फायदा झालेला आहे. सध्या संस्थेचा व्याजदर १०.००% इतका आहे
कर्ज मर्यादेत वाढ - विद्यमान संचालक मंडळाने सर्वसाधारण कर्ज मर्यादा २५ लाखावरुन ५० लाख तसेच आकस्मिक कर्ज मर्यादा रु.५० हजार वरुन रु.८० हजार केली. तसेच समान मासिक हप्ता (EMI) पध्दतीने कर्ज वितरण करण्याचा निर्णय घेतल्याने जास्तीत जास्त कर्ज मर्यादेचा लाभ सभासदांना मिळालेला आहे.
संस्था कार्यक्षेत्र वाढ - संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली जिल्हा हे होते. कोल्हापूर व सातारा येथील सभासदांच्या सोईकरिता संस्थेचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा महत्वपुर्ण निर्णय विद्यमान संचालक मंडळाने घेवून कोल्हापूर व सातारा जिल्हा कार्यक्षेत्र वाढ मंजुर करुन घेवून कोल्हापूर व कराड येथे नव्याने शाखा सुरु करुन तेथील सभासदांची होत असलेली गैरसोय त्यामुळे थांबलेली आहे.
स्वमालकीच्या इमारती - - विद्यमान संचालक मंडळाने गेल्या ५ वर्षाच्या कार्यकालामध्ये विजयनगर, विटा, जत, शिराळा, तासगांव व इस्लामपूर या ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या वास्तु उभारलेने दरमहा भरावे लागणारे भाडे व दरवर्षी भाडयामध्ये होणारी वाढ थांबलेली आहे.
पुरबाधीत सभासदांना मदत - महाराष्ट्रात महापूराने थैमान घातले होते सांगली, कोल्हापूर व कराड या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील अनेक सभासद पुरबाधीत होवून त्यांना मोठया आर्थिक नुकसानीस तोंड द्यावे लागले आहे. सदर पुरबाधीत सभासदांना विद्यमान संचालक मंडळाने आर्थिक मदतीचा हात दिलेला आहे.
करोना व्हायरस (कोव्हीड १९) - चालू वर्षी करोना व्हायरसने राज्यामध्ये थैमान घातले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज हे कोवीड सेंटर म्हणून शासनाने घोषीत केले आहे. सदर रुग्णालयास जिवनावश्यक वस्तु उदा. गहू, तांदूळ इ. चे वाटप करण्यात आले आहे.
दुष्काळग्रस्त गावांना पाण्याच्या टाक्या व चारा छावणीस ओला चारा प्रदान - विद्यमान संचालक मंडळाने महाराष्ट्रभर पडलेल्या भीषण दुष्काळाचा विचार करुन सामाजिक बांधीलकीच्या भावनेने सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील २६ गावांना ५ हजार लिटर क्षमतेच्या २६ पाण्याच्या टाक्या लोकार्पण करुन चारा छावणीस १० टन ओला चारा देवून दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला आहे
भव्य क्रीडा स्पर्धा - संस्थेमार्फत प्रतिवर्षी भव्य क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात असून सांघिक स्पर्धेमध्ये क्रिकेट,व्हॉलीबॉल,कबडडी व रस्सीखेच या खेळांचा समावेश असून वैयक्तिक स्पर्धेमध्ये धावणे, लांबउडी व पोहणे या खेळाच्या स्पर्धा घेतल्या जातात. विद्यमान संचालक मंडळाने सदर भव्य क्रीडा स्पर्धेकरिता भरीव आर्थिक तरतुद करुन बक्षीसांमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे.
सॅलरी आपल्या दारी - सभासद कामानिमित्त संस्थेत येतात, मात्र सभासदांच्या अडीअडचणी जागेवरच सोडविणे,नवीन सभासद करणे, सभासदांचे सांघिक प्रश्न समजून घेणे याकरिता सॅलरी आपल्या दारी हा उपक्रम राबविणेत आला आहे.
गुणवंत विद्यार्थी बक्षीस योजना - सभासदांचे आशास्थान ही त्यांची मुले आहेत. सभासदांच्या गुणवंत पाल्यांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांचे कौतुक करुन प्रोत्साहन देणे हे संस्थेचे आद्य कर्तव्य आहे त्याकरिता गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ संस्थेमार्फत प्रतिवर्षी आयोजित केला जातो. विद्यमान संचालक मंडळाने संस्थेच्या नफ्यातून ३ लाख रु. इतक्या भरीव रक्कमेची या योजनेसाठी तरतुद करुन सभासदांच्या पाल्यांच्या बक्षीस रक्कमेत भरघोस वाढ केलेली आहे.
दिनदर्शिका - संस्थेची सांपत्तीक स्थिती, संस्था राबवत असलेले विविध उपक्रम यांची माहिती सभासद व शासकीय कर्मचाऱ्यांना व्हावी या उद्देशाने दिनदर्शिका काढणेचा उपक्रम राबविलेला आहे.
सामाजिक बांधीलकी - विद्यमान संचालक मंडळाने सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून अनाथाश्रम व वृध्दाश्रम यांना विविध प्रकारची मदत त्याचबरोबर स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना संगणक वाटप, गरीब गरजू विद्यार्थांना शालोपयोगी साहित्य वाटप, आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीर, विस्थापीत झालेल्या पूरग्रस्तांसाठी अन्नदान इ. मदतकार्य केले
विद्यमान संचालक मंडळाने त्यांचे कार्यकालामध्ये केलेल्या भरीव कामगिरीमुळे संस्थेस खालील प्रमाणे विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
१) संस्थेस १०० कोटी पर्यंतच्या पगारदार नोकरांच्या पतसंस्था विभागात राज्यस्तरीय बँको प्रथम पुरस्कार
२) सहकार सुगंध, पुणे यांच्यावतीने उत्कृष्ठ पतसंस्था चा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
३) बिझनेस एक्सप्रेस, सांगली यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था श्री पुरस्कार
अ.क्र. | शाखेचे नाव | खाते नंबर | IFSC कोड नंबर |
---|---|---|---|
१ | मुख्यशाखा सांगली | ३१ ०८५ ३९९ ५९४ | SBIN 0000471 |
२ | शाखा मिरज | ३१ ७७८ ६७८ ९३५ | SBIN 0000428 |
३ | शाखा इस्लामपूर | ३१ ८०३ १८२ ०३४ | SBIN 0000534 |
४ | शाखा तासगांव | ३१ ७८९ ८७६ ५३६ | SBIN 0000527 |
५ | शाखा जत | ३१ ८२७ ६७५ ७३६ | SBIN 0005852 |
६ | शाखा शिराळा | ३१ ८०० २६४ ८१६ | SBIN 0011644 |
७ | शाखा विटा | ३१ ७६४ ०३७ ३९५ | SBIN 0000285 |
८ | शाखा विश्रामबाग | ३६ ००६ ३६४ ५६८ | SBIN 0017528 |
९ | शाखा कोल्हापूर | ३६ ९५८ ९९२ ७१५ | SBIN 0015224 |
१० | शाखा कराड | ३६ ९९८ २७४ २५४ | SBIN 0004648 |