सॅलरी सोसायटीचा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात पार
दि सांगली सॅलरी अर्नर्स कॉ ऑप सोसायटी ली., सांगली या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ शनिवार दिनांक ०८/०७/२०२३ रोजी भावे नाट्य मंदिर सांगली येथे मा. डॉ. श्री प्रेमचंद कांबळे,उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली व मा. डॉ. सचिन भंडारे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आष्टा व प्रसिद्ध वक्ते कथाकथानकार प्रा आपासाहेब खोत कोडोली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरवात संस्थेचे चेअरमन श्री नित्यानंद मोहिते यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली.विद्यार्थी व पालक याना संबोधित करताना मा. प्रेमचंद कांबळे म्हणाले सरकारी कर्मचाऱ्यांची महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा संस्थेच्या कार्यक्रमास आपण मला बोलावल्याबद्दल संयोजकांचे आभार मानून पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकांनी पाल्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध न लादता त्यांच्या कलानुसार त्यांचे क्षेत्र निवडू द्या.त्याचप्रमाणे मुलांना इतर क्षेत्रात हि त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. व नेहमी चांगल्या व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल करा असा मोलाचा सल्ला याप्रसंगी दिला .
तसेच या प्रसंगी प्रमुख वक्ते आप्पासाहेब खोत यांनी विद्यर्थ्यांना प्रभोधनपर भाषण करून महापूर या कथेचे कथाकथन केले. तसेच कार्यक्रमाचे पाहुणे डॉ सचिन भंडारे यांनी देखील विद्यार्थ्यांना समर्पक भाषेत प्रभोधनपर भाषण दिले व शेवटी संस्थेच्या व्हा चेअरमन सुलताना जमादार यांनी विद्यर्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व सभासदांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक,मार्गदर्शक,श्रेष्टी व सेक्रेटरी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते