सॅलरी सोसायटी च्या १११ व्या वर्धापन दिनानिम्मित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
शासकीय नोकरदारांच्या पतसंस्थेत महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंथा म्हणून नावलौकिक असणाऱ्या सॅलरी सोसायटी मध्ये १११ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि ०४/१०/२०२३ रोजी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी तब्बल ८१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेने सभासद व ठेवीदारांसाठी सॅलरी धन वर्षा ठेव या योजनेचा शुभारंभ केला असून पहिल्याच दिवशी १ कोटीची ठेव संस्थेकड़े जमा झाली आहे..
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन,व्हा.चेअरमन,सर्व संचालक,संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते