दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप सोसायटी ली. सांगली दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा दि ०८/०१/२०२३ रोजी संस्थेच्या प्रधान कार्यालय येथे संस्थेचे चेअरमन नित्यानंद मोहिते व व्हा. चेअरमन सुलताना आन्सार यांचे शुभ हस्ते व संचालकांचे उपस्थितीमध्ये संप्पन झाला. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री मोहिते यांनी केले. दिनदर्शिका काढणेमागची भूमिका स्पष्ट करून संस्थेच्या कामकाजचा आढावा घेतला. संस्थेची संपत्तीक स्थिती,संस्था राबवत असलेले विविध उपक्रम यांची माहिती सभासद व शासकीय कर्मचाऱ्यांना व्हावी या उद्देशाने सॅलरीने दिनदर्शिका काढलेली आहे असे चेअरमन यांनी स्पष्ट केले. तसेच सहकार क्षेत्रात सॅलरीने महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात संस्था कोअर बँकिंगच्या माध्यमातून सभासद ठेवीदार यांना अत्याधुनिक बँकिंग सेवा देत असलेबाबत समाधान व्यक्त करून सरकारी कर्मचाऱ्यांची सॅलरी सोसायटी हि एक अभिनव संस्था असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी संचालक शक्ती दबडे, झाकीरहुसेन चौगुले मिलिंद हारगे ,गणेश जोशी, संजय माने,संदीप हिरुगडे,रणधीर पाटील,हुनुरसिद्ध बिराजदार,मनोज दाभाडे,शरद पाटील,योगेश कबाडे,मोरेश्वर रामदासी महादेव वंजारी,राजेंद्र कांबळे,निजाम नदाफ,आकाराम चौगुले,सुषमा जाधव,गणेश धुमाळ,
विश्वास यादव-पाटील ,जॉ.सेक्रेटरी विजय शिरगांवे,सभासद व कर्मचारी उपस्थित होते.