सॅलरीच्या चेअरमन पदी श्री मोरेश्वर रामदासी तर व्हा चेअरमन पदी श्री संदीप हिरुगडे यांची बिनविरोध निवड !!!
दि ०९/१०/२०२३ रोजी दि सांगली सॅलरी अर्नर्स कॉ ऑप सोसायटी ली.; सांगली या संस्थेच्या चेअरमन पदी श्री मोरेश्वर रामदासी यांची व व्हा चेअरमन पदी श्री संदीप हिरुगडे यांची संचालक मंडळाचे सभेमध्ये एकमताने निवड झाली . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उर्मिला राजमाने, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगली यांनी काम पहिले. सदरची निवड झालेबद्दल विविध स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोरेश्वर रामदासी हे पाटबंधारे विभाग,इस्लामपूर येथे कार्यरत आहेत. व संदीप हिरुगडे हे भूमी अभिलेख कार्यालय इस्लामपूर येथे कार्यरत आहेत.
याप्रसंगी मावळते चेअरमन नित्यानंद मोहिते यांनी नूतन चेअरमन मोरेश्वर रामदासी यांचा व मावळत्या व्हा चेअरमन सुलताना जमादार यांनी नूतन व्हा चेअरमन संदीप हिरूगडे यांचा सत्कार केला
याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक मंडळ,श्रेष्ठी , बहुसंख्य सभासद,सेक्रेटरी विजय शिरगावे व कर्मचारी उपस्थित होते