दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप सोसा.ली, सांगली या संस्थेने कर्ज व्याज दरात अर्धा टक्के कपात करून सभासदांना दिलासा दिलेची माहिती
चेअरमन अभिमन्यु मासाळ व व्हा. चेअरमन प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री मासाळ व श्री पाटील साहेब म्हणाले कि, सभासदाचे हित लक्षात घेऊन संचालक मंडळाच्या दि २० सप्टेंबर २०२० रोजीच्या सभेमध्ये दि १ ऑक्टोबर २०२० पासून कर्जाच्या व्याजदरात अर्धा टक्के कपात करण्याचा निर्णय एकमताने घेणेत आला. मागील काही दिवसापासून सभासदांकडून लाभांश थोडा कमी मिळाला तरी चालेल पण कर्ज व्याजदरात कपात करावी अशी सातत्याने मागणी केली जात असल्याने याबाबतचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
याबाबत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष,जे.के महाडीक म्हणाले की,संचालक मंडळाने अत्यंत चांगला व धाडसी निर्णय घेतला असलयाने सभासदांचा फायदा होणार आहे.यापुढे संचालक मंडळाने खर्चात काटकसर करून लाभांश कमी होणार नाही याची दक्षता घेणेचे आवाहनही श्री. महाडीक यांनी केले.
याप्रसंगी संस्थचे संचालक लालासाहेब मोरे,शरद पाटील,प्रदीप कदम,झाकीरहुसेन चौगुले,जाकीरहुसेन मुलाणी,अनिल पाटील,जे.के. पाटील,
पी. एन.काळे,राजेंद्र कांबळे,मलगोंडा कोरे,सुहास सूर्यवंशी,रामचंद्र महाडीक,गणेश जोशी,शक्ती दबडे,अरुण बावधनकर,अश्विनी कोळेकर,विद्यमाती रायनाडे राजू कलगुटगी,राजेंद्र बेलवलकर तसेच सेक्रेटरी वसंत खांबे उपस्थिती होते.