दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप सोसा.ली, सांगली या महाराष्ट्रातील अग्रगण्य शतक महोत्सवी संस्थेच्या वेबसाईटचे अनावरण रविवार दि. ६/९/२०२० रोजी संस्थेच्या सभागृहात संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक मा. डॉ.श्री. जे. के. महाडिक यांच्या हस्ते व चेअरमन अभिमन्यु मासाळ ,व्हा चेअरमन प्रकाश पाटील व संचालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी चेअरमन अभिमन्यु मासाळ यांनी जगाची २१ व्या शतकाकडे वाटचाल सुरु असून माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात संस्था कोअर बँकिंगच्या माध्यमातून सभासद,ठेवीदार यांना अत्याधुनिक बँकिंग सेवा देत आहेच, परंतु संस्थेच्या विविध योजनांची ,संस्था राबवित असलेल्या उपक्रमांची तसेच वेळोवेळी संस्थेच्या कामकाज होत असलेल्या बदलाची माहिती संस्थेचे सभासद ,ठेवीदार व हितचिंतक यांना मिळावी या उद्देशाने www.sanglisalary.com या नावाने वेबसाईट सुरु केल्याचे यावेळी सांगितले.
याप्रसंगी संस्थचे संचालक लालासाहेब मोरे,शरद पाटील, रामचंद्र महाडिक,पी.एन.काळे, राजेंद्र कांबळे, मलगोंड कोरे, शक्ती दबडे,अरुण बावधनकर, अश्विनी कोळेकर,राजू कलगुटगी,राजेंद्र बेलवलकर,नाभिराज सांगले पाटील तसेच सेक्रेटरी वसंत खांबे व कर्मचारी उपस्थितीत होते.