दि १८/०४/२०२२ रोजी दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटी लि.सांगली या संस्थेच्या चेअरमन पदी श्री प्रकाश नारायण काळे(ऑफिस-हिवताप कार्यालय,कोल्हापूर) यांची व व्हा. चेअरमन पदी श्री. मलगोंडा शिवाप्पा कोरे(ऑफिस -शासकीय महाविद्यालय मिरज ) यांची संचालक मंडळाचे सभेमध्ये एकमताने निवड झाली. सदरची निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नूतन चेअरमन श्री पी. एन. काळे यांचा सत्कार संस्थेचे मावळते चेअरमन
श्री राजेंद्र कांबळे यांचे हस्ते व नूतन व्हा.चेअरमन श्री.मलगोंडा कोरे यांचा सत्कार मावळते व्हा. चेअरमन श्री अरुण बावधनकर यांचे हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना चेअरमन श्री पी. एन. काळे यांनी सॅलरी च्या उत्कर्षात कटिबद्ध राहून संस्थेच्या भरभराटीसाठी प्रयत्नशील राहून संस्थेच्या नावलौकिकात भर घालू अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व संचालक मंडळ ,संस्थेचे मार्गदर्शक डी. जी. मुलाणी ,जे.के. महाडिक, सुरेंद्र पेंडुरकर व आदी मान्यवर उपस्थित होते तसेच विविध शासकीय विभागाचे पदाधिकारी व संस्थेचे सेक्रेटरी श्री वसंत खांबे उपस्थित होते.