सॅलरी संस्थेस २०२२-२३ या आर्थिक वर्षात ९.३३ कोटीचा विक्रमी नफा ✔
दि सांगली सॅलरी अर्नर्स को ऑप सोसायटी लि.,सांगली या संस्थेची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि २३/०७/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता सांगली येथील कै. विष्णुदास भावे नाट्य नाट्यमंदिर ,सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे संस्थेस २०२२-२३ या आर्थिक वर्षांमध्ये ९. ३३ कोटी चा विक्रमी नफा झाला असून सभासदाना ९% लाभांश वाटप म्हणजेच यापैकी ६ कोटी ३० लाख ४१ हजार इतका लाभांश व कायम ठेवीवर डिव्हीडंड दराने १ कोटी ३७ हजार इतके व्याज सभासदाना वाटप करणेचा मानस आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन नित्यानंद मोहिते यांनी पत्रकार परिषदेवेळी दिली.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात कर्ज मागणी मध्ये ३२ कोटी ३३ लाखाची वाढ होऊन संस्थेच्या विकास वाढीस चालना मिळालेली आहे.त्याच प्रमाणे संस्थेने अल्प हप्त्याच्या बदल्यात मयत सभासदाचे संपूर्ण कर्ज निरंक करण्याची सॅलरी कर्ज सुरक्षा निधी फंड हि अभिनव महत्वकांक्षी योजना सन २०१६-१७ पासून संस्थेकडून सुरु असून सदर योजनेतून आज अखेर एकूण १३८ मयत सभासदांना रक्कम रु ८,९०,८२,२६४/-मदत देऊन सदर योजने अंतर्गत त्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. सदर योजनेमुळे कर्जदाराचे जमीनदार व वारसदार यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.सदर योजनेचे सभासदांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले.
संस्थेने सर्वच पातळीवर लक्षणीय कामगिरी बजावली आहे. संस्थेची कर्जे रु २९६कोटी,ठेवी रु. २१९.४७ कोटी ,भागभांडवल रु. ७४.९३कोटी , गुंतवणूक रु. ४४.४४ कोटी असून संस्थेने ५००कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे. तसेच संस्थेचे सभासद ९२९५ इतके आहेत. संस्थेस २०२२-२३ या आर्थिक वर्षात बँको यांचे वतीने उत्कृष्ट पतसंस्थेचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून संस्थेस सतत ऑडिट वर्ग अ आहे.
संस्थेने कोअर बँकिंग प्रणालीचा स्वीकार करून सर्व शाखा online केल्याने सभासदांना संस्थेशी व्यवहार करणे सोपे व सोयीचे झाले आहे.अशी माहिती संस्थेचे चेअरमन नित्यानंद मोहिते यांनी पत्रकार परिषदेवेळी दिली. या पत्रकार परिषदेवेळी संस्थेच्या व्हा चेअरमन सुलताना जमादार व सर्व संचालक मंडळ ,तसेच संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक व श्रेष्ठी, सेक्रेटरी उपस्थित होते