दि सांगली सॅलरी अर्नर्स को ऑप सोसायटी ली. सांगली या संस्थेच्या वतीने संस्थेने आयोजित केलेल्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार सोहळा संस्थेच्या प्रधान कार्यालय,सांगली येथील नूतन हॉल मध्ये मा. डॉ. श्री निलेश मालगार,एम.डी. मेडिसिन. मिरज यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे चेअरमन
श्री पी. एन. काळे व संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संस्थेचे दिवंगत माजी चेअरमन कै. लालासाहेब मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. संस्थेचे चेअरमन मा. श्री. पी.एन काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रसंगी डॉ. निलेश मालगार यांनी सेवानिवृत्तीनंतर आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी व राहणीमाना बाबतचे व्याख्यान दिले. संस्थेतर्फे शासनाच्या विविध खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या जवळपास ३०० अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे व्हा. चेअरमन मलगोंडा कोरे ,सर्व संचालक मंडळ ,संस्थेचे मार्गदर्शक डी. जी. मुलाणी सुरेंद्र पेंडुरकर दिलीप पाटील, पी. वाय. जाधव ,सी एच पाटील आदी मान्यवर व संस्थेचे सेक्रेटरी श्री वसंत खांबे उपस्थित होते.