दि सांगली सॅलरी अर्नर्स को ऑप सोसायटी ली. सांगली या संस्थेच्या वतीने संस्थेने आयोजित केलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ सोहळा भावे नाट्य मंदिर सांगली येथे मा श्री सुधीर नणंदकर अधिष्ठाता वसंतदादा पाटील शास. रुग्णा. सांगली यांच्या अध्यक्षतेखाली व मा डॉ श्री रुपेश शिंदे सहाय्यक अधिष्ठाता,शास. वैद्य. महाविद्यालय व रुग्णा. मिरज यांचे शुभ हस्ते व प्रसिद्ध वक्ते प्रा. विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
कार्यक्रमाची सुरवात संस्थेचे चेअरमन मा श्री. पी. एन. काळे यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. याप्रसंगी विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल सभासदांच्या पाल्याचा यांचा सत्कार घेण्यात आला.विद्यार्थी व पालक याना संबोधित करताना मा. नणंदकर साहेब म्हणाले सरकारी कर्मचाऱ्यांची महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा संस्थेच्या कार्यक्रमांस आपण मला बोलाविल्याबद्दल संयोजकांचे आभार मानून पालकांनी पाल्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध न लादता त्यांच्या कलानुसार त्यांचे क्षेत्र निवडू द्या. व नेहमी चांगल्या व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल करा.
तसेच या प्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. विजय जाधव यांनी विद्यर्थ्यांना प्रबोधनपर भाषण करून व्याख्यान दिले. .तसेच कार्यक्रमाचे पाहुणे मा डॉ रुपेश शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना अतिशय समर्पक भाषेत प्रबोधनपर भाषण दिले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे व्हा. चेअरमन मलगोंडा कोरे ,सर्व संचालक मंडळ ,संस्थेचे मार्गदर्शक डी. जी. मुलाणी ,जे.के. महाडिक, सुरेंद्र पेंडुरकर दिलीप पाटील, पी वाय जाधव ,सी एच पाटील,सदशिव सूर्यवंशी,सुभाष पाटील व आदी मान्यवर,संस्थेचे सेक्रेटरी श्री वसंत खांबे उपस्थित होते. तसेच बहुसंख्य पालक सभासद व पाल्य उपस्थित होते.